इंग्रजी भाषा विषयी सर्व महिती मराठीत. Information about English language in marathi language.

  इंग्रजी भाषा विषयी सर्व महिती मराठीत.Information about English language in marathi language.

इंग्लंड देशात राहणाऱ्या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणाऱ्या व समजल्या जाणाऱ्या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.

EN (ISO 639-1)
निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे
३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.
इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. ॲंग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतिकीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्त्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

How to earn money on Sharechat app in 5 easy ways! in English language

भारत में Instagram ॲप से पैसे कमाने के 9 तरीके. 9 Ways to Make Money from Instagram in India.

आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi