अभ्यास कसा करावा मुलांनी अभ्यास आणि वेळ नियोजन कसे करावे . How to do study in marathi language. Mind Ko Fresh Kaise Kare – ये है 8 तरीक How To Focus In Study : अनेक विद्यार्थी असे असतात, ज्यांना अगदी मनापासून अभ्यास करायचा असतो. चांगले गुण मिळवायचे असतात, पण तरीही अभ्यास करायला बसले तरी त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. चित्त एकाग्र होत नाही. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे तर एकाग्र चित्ताने अभ्यास करणं आवश्यक आहे. पण हल्लीच्या वातावरणात मुलांचं लक्ष विचलित होईल, अशा अनेक गोष्टी त्यांच्या आजुबाजूला असतात. मोबाईल, त्यातलं सोशल नेटवर्किंग, ऑनलाइन गेम्स मित्र-मैत्रीणी, कुटुंबीय, आजूबाजूचा गोंगाट या नानाविध गोष्टी चित्त विचलित करण्याचं काम चोख बजावत असतात. हे सर्व अडथळे पार करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं काम मुलांना करायचं असतं. म्हणूनच आम्ही देत आहोत काही टिप्स ज्या तुमच्या कामी येतील. -choose-appropriate-place-to-study अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट वातावरणाचीही आवश्यकता असते. म्हणून योग्य जागा निवडा. काही गोष्टी ध्यानात असू द्या. अभ्यासाला बसण्यासाठी अशी जागा निवडा जिथलं वातावरण...