आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi
आयटीआय कोर्स म्हणजे काय? ITI Course Information in Marathi आयटीआय (ITI) हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ITI चा Full Form हा “Industrial Training Institute” असा होतो, याला मराठीत “औद्योगिक प्रकाशन संस्था असे म्हणतात. आयटीआय हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते. या कोर्स मध्ये पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण कॉलेज आहेत. यांद्वारे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे हा आयटीआय कोर्स खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. ITI मध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर, असे अनेक ट्रेड्स असतात. ट्रेड नुसार विद्यार्थ्याला त्या-त्या गोष्टीचे प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जाते. प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ट्रेड निवडण्याचा पर्याय असतो. आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET महाराष्ट्र च्या सरकारी व...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें