तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? अशा वेळी काय करणे आवश्यक आहे?

INSTAGRAM इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ? 

1. तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं?

 2.अशा वेळी काय करणे आवश्यक आहे? 


1.सध्याच्या काळात मोबाईल फोन ही एक महत्वाची वस्तु बनली आहे. फोन करणे ह्या महत्वाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ईमेल करणे, बँकेचे व्यवहार करणे, वेगवेगळी बिले भरणे ही कामे देखील फोनवर केली जातात. त्याचप्रमाणे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून फोटो आणि व्हिडिओ काढणे हा फोनचा आणखी एक महत्वाचा उपयोग बनला आहे.
पण त्यामुळेच मोबाईल फोनची सुरक्षितता देखील अतिशय आवश्यक बनली आहे. आपल्या संदर्भातली इतकी सगळी गोपनीय आणि महत्वाची संवेदनशील माहिती फोनवर उपलब्ध असताना तो दुसऱ्या कोणा वाईट व्यक्तीच्या हाती लागला तर होणारे नुकसान खूप मोठे असेल.
ह्याच कारणामुळे आपला फोन हॅक होणे हे मोठे नुकसान ठरू शकते.


2.मोबाईल फोन हॅक होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.


आपला मोबाईल फोन हॅक होण्याची शक्यता नेमकी किती असते? आपला फोन हॅक होतो म्हणजे नेमके काय होते? आपला फोन हॅक झाला आहे हे नेमके कसे ओळखावे? तसेच आपला फोन हॅक झाला असेल तर काय करावे ?
आज आपण या बाबतीतील सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
सर्व वाचकांच्या मनात असा प्रश्न असतो की माझा आयफोन किंवा अँड्रॉइड फोन हॅक होऊ शकतो का?
दुर्दैवाने ही बाब खरी आहे. कोणाचाही फोन हॅक होऊ शकतो. सायबर गुन्हे करणारे लोक तसे करण्यात तरबेज बनले आहेत. आयफोन असो अथवा अँड्रॉइड फोन तो हॅक होऊ शकतो.

सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांना तुमच्या फोनमधील सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जसे की बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स, फोटो आणि व्हिडिओ या सर्वांमध्ये इंटरेस्ट असतो. आर्थिक अफरातफर, फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर, क्रेडिट कार्ड वापरून भरमसाठ खरेद्या अशा प्रकारचे गुन्हे फोन हॅक करून केले जातात.
हे होऊ द्यायचे नसेल तर आपला फोन हॅक होण्यापासून सुरक्षित ठेवला पाहिजे.
आपला फोन हॅक झाला आहे हे कसे ओळखायचे?
तुमच्या फोन बाबत काही संशयास्पद गोष्टी घडत आहेत का? आपला फोन हॅक झाला आहे असे तुम्हाला आतून वाटते आहे का?
असे अगदी सहज घडू शकते. एखादे ॲप डाऊनलोड करताना किंवा एखादे सॉफ्टवेअर वापरताना क्षणार्धात तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो. एखाद्यावेळी सिक्युअर नसलेले 4सार्वजनिक वायफाय वापरले तरी सुद्धा फोन हॅक होऊ शकतो.
एकदा फोन हॅक झाला की त्यात खालील ५ विशिष्ट लक्षणे आढळून येतात.


१. डेटाचा वापर वाढतो.


तुमच्या मोबाईल फोन वरील डेटा जर अचानकपणे जास्त प्रमाणात वापरला जात असेल तर तुमचा फोन हॅक झाला आहे अशी शंका येण्यास जागा आहे. आपल्या नेहमीच्या वापरापेक्षा जास्त प्रमाणात डेटा वापरला जातोय का यावर लक्ष ठेवावे.
तसे होत असल्यास तज्ञांची मदत घेऊन ही समस्या दूर करावी. आपल्या फोनमध्ये settings मध्ये जाऊन नेमका किती मोबाईल डेटा वापरला जातो हे तपासून पाहता येते.


२. फोनमध्ये आपोआप विचित्र गोष्टी घडू लागतात.


आपला मोबाईल फोन जर हॅक झालाफोनमध्ये एखादा व्हायरस घुसला असेल तर फोनमध्ये एखादे अँप आपोआप डाउनलोड होणे, एखादे अॅप आपोआप सुरु होणे, फोन अचानक बंद पडून पुन्हा रिस्टार्ट होणे अशासारख्या विचित्र गोष्टी घडू लागतात.
काही वेळा फोन अतिशय धीम्या गतीने सुरु राहतो किंवा अचानक बंद पडतो. अशावेळी आपल्या फोनच्या बाबतीत काहीतरी चुकीचे घडले आहे हे ओळखावे.


३. फोनची क्षमता कमी होणे.


जर मोबाईल फोन हॅक झाला असेल तर तो पूर्वी इतक्या क्षमतेने काम करत नाही. ॲप्स लोड करण्यासाठी, ई-मेल अथवा बँकेच्या साईट उघडण्यासाठी आधीपेक्षा जास्त वेळ लागू लागतो. फोनची बॅटरी लवकर लवकर संपू लागते.
काहीवेळा आपण डाऊनलोड न केलेले अॅप फोनवर दिसून ते जास्त प्रमाणातबॅटरीचा वापर करत आहेत असे दिसते. असे होत असेल तर फोन हॅक झाला आहे हे नक्की.


४. आपल्या फोनद्वारे क्रेडीट कार्ड अथवा नेट बँकिंग वापरून पैसे खर्च होणे.


आपण जर फोन वापरून डिजिटल पेमेंट करत असू तर आपल्या बँकेच्या आणि पेमेंटच्या सर्व व्यवहारांवर आपले बारीक लक्ष हवे. फोन हॅक करून वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक सायबर गुन्हे करण्याची प्रवृत्ती हल्ली वाढत चालली आहे.
यामध्ये नेट बँकिंगचा वापर करून तुमच्या अकाउंटमधले पैसे चोरणे, क्रेडिट कार्डचा वापर करून तुमच्या नावावर भरमसाठ खरेद्या करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
आपल्या बँकेतील खात्यावर, तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादीच्या वापरावर अतिशय बारीक नजर ठेवणे आवश्यक असते.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi

12 ways to make money online English language.

How to earn money on Sharechat app in 5 easy ways! in English language