INSTAGRAM इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ?

तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? अशा वेळी काय करणे आवश्यक आहे? 

इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ?

आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊ नये म्हणून इंस्टाग्राम हॅक कसे केले जाते हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
कोणतेही इंस्टाग्राम अकाउंट आपोआप हॅक होत नाही. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असते. एक हॅकर आपले इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा वापर करु शकतो हे तुम्हाला तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
1. Phishing
फिशिंग हि हॅक करण्याची अशी पद्धत आहे ज्याच्या मदतीने आपले अकाऊंट हॅक झाले तरी आपल्याला कळणार नाही.
फिशिंगमध्ये हॅकर एक खोटे लॉगिन पेज बनवतो जे हुबेहूब खऱ्या लॉगिन पेज सारखे दिसते. आपण जेव्हा या खोट्या लॉगिन पेजमध्ये आपले ID व पासवर्ड टाकतो तेव्हा तो हॅकर कडे एका फाईलच्या स्वरुपात Save होतो. आणि मग आपल्याला खऱ्या साईट वर Redirect केले जाते.
अशा प्रकारे खोटी वेबसाईट बनवून हॅकर आपली माहिती मिळवतात आणि मग आपले अकाऊंट हॅक करतात. त्यामुळे लॉगिन करताना योग्य त्या साईट वरुनच लॉगिन करा.
2. Keylogger
सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याचा हा दुसरा एक पर्याय आहे. 
Keylogger हे असे सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने आपण कीबोर्ड वर जे काही टाईप करतो ते सर्व एका फाईलमध्ये रेकॉर्ड होते. व हि फाईल नंतर केव्हाही वाचली जाऊ शकते. 
एखादा युझर जेव्हा ID व पासवर्डद्वारे लॉगिन करतो तेव्हा त्याला माहित नसते कि आपली सर्व वैयक्तिक माहिती दुसरा कोणी पाहत आहे. कॉम्प्युटरसाठी Keylogger तर अँड्रॉईड किंवा iphone साठी ikeymonitor वापरले जाते. 
3. फेसबुक अकाऊंट
आपल्यामधील बरेच जणांचे इंस्टाग्राम हे फेसबुक सोबत जोडलेले असेल. जेव्हा आपण इंस्टाग्राम वर नवीन पोस्ट टाकतो तेव्हा ती आपोआप फेसबुक वर शेअर व्हावी हा या मागचा उद्देश असतो. 
पण याचा फायदा हॅकरला देखील होतो. जर त्यांना आपला फेसबुक ID व पासवर्ड मिळाला तर ते सहज आपले इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करु शकतात. 
4. खोटे इंस्टाग्राम अँप
आज आपल्याला इंटरनेट वर मोठ्या प्रमाणात खोटे अँप पाहायला मिळतील. इंस्टाग्रामचे देखील खूप सारे फेक अँप्स बनलेले आहेत. काही जण हेच फेक अँप install करतात व लॉगिन करतात आणि मग त्यांची सर्व गुप्त माहिती हॅकर पर्यंत जाते. 
त्यामुळे कोणतेही सोशल मीडिया अँप install करताना किंवा इंस्टाग्राम अँप install करताना आपल्याला खरे अँप कोणते आहे व ते कसे दिसते हे माहित असणे गरजेचे आहे. 
कधी ही एखादे अँप install करताना Play Store चा वापर करा. म्हणजे खोटे अँप पासून तुम्ही सुरक्षित रहाल.
इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यासाठी हे काही प्रभावी माध्यम आहेत ज्याद्वारे ते आपले अकाउंट हॅक करु शकतात. 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi

12 ways to make money online English language.

How to earn money on Sharechat app in 5 easy ways! in English language