अभ्यास कसा करावा मुलांनी अभ्यास आणि वेळ नियोजन कसे करावे . How to do study in marathi language.

How To Focus In Study. अभ्यासावर लक्ष कसे लावावे माहित करून घ्या.

Mind Ko Fresh Kaise Kare – ये है 8 तरीके


अभ्यास कसा करावा | मुलांनी अभ्यास आणि वेळ नियोजन कसे करावे | abhyas kasa karava >>

 अनेक लहान मुलांच्या पालकांना असा प्रश्न पडतो की मुलांनी अभ्यास कसा करावा.आणि काही मोठ्या मुलांना देखील प्रश्न पडतो की अभ्यास कसा करायचा, अभ्यास नियोजन कसे करावे किंवा अभ्यास किती वेळ करावा.

तर मित्रांनो अशा प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पुस्तक वगैरे नसते तर त्यासाठी तुम्हालाच काही बदल करावे लागतील. तेच बदल कोणते व कसे करावे या विषयीची माहिती तुम्हाला ह्या लेखा मध्ये देण्याचा हा प्रयत्न.
बहुतांश मुलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो, म्हणजे जर अभ्यासाचे नियोजन नसेल आणि व्यवस्थित अभ्यास नसल्यामुळे परीक्षेत नापास होणे किंवा हुशार असून देखील कमी मार्क पडणे असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी अभ्यास कसा करावा हे शास्त्र तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. चला तर मग अभ्यास कसा करायचा या बाबत काही टिप्स जाणून घेऊयात.
Table of Contents
अभ्यास कसा करावा / करायचा | अभ्यास किती वेळ करावा |अभ्यासाचे नियोजन कसे करावे – ८ मार्गदर्शक टिप्स
एकाग्रतेने अभ्यास कसा करावा
अभ्यासाची वेळ
अभ्यास किती वेळ करावा
अभ्यासाचे नियोजन कसे करावे

तात्पर्य – अभ्यास कसा करावा | abhyas kasa karava


अभ्यास कसा करावा / करायचा | अभ्यास किती वेळ करावा |अभ्यासाचे नियोजन कसे करावे – मार्गदर्शक टिप्स


प्रत्येकाची अभ्यास करण्याची वेगवेगळी पद्धत असते, काही ठराविक पण उपयुक्त टिप्स तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. यातील निवडक टिप्स जरी तुम्ही अंगीकारल्या तरी त्याचा तुम्हाला निच्छितच फायदा होईल.
एकाग्रतेने अभ्यास कसा करावा
तुम्ही अभ्यास करायला बसला की तुम्हाला नाही नाही ती कामे आठवतात आणि मग अभ्यासात मन लागत नाही. यांसारख्या गोष्टींपासून स्वतःला वेगळे ठेवण्या साठी तुमचा तुमच्या मनावर ताबा असणे गरजेचे आहे. तुम्ही जेवढा वेळ पण अभ्यास कराल तो पुर्णपणे एकाग्रतेने करावा. एकाग्रतेने केलेली कोणती ही गोष्ट ही उत्तमच होत असते. आपण एकाग्रतेने केलेला अभ्यास हा तुमच्या कायम लक्षात राहील व त्याची अनुभूति तुम्हाला परीक्षा देताना येईल.


अभ्यासाची वेळ.


अभ्यास कधी करायचा हे पूर्णतः तुमच्या वर अवलंबून आहे. म्हणजे ज्यावेळी तुमचे मन प्रसन्न असेल त्यावेळी तुम्ही अभ्यास करावा ज्यामुळे केलेले वाचन लक्षात राहते.
काहीं जणांना पहाटे उठून अभ्यास करायची सवय असते तर काहींना रात्रीची जागून अभ्यास करायची सवय असते. तुमच्या अभ्यास करण्याची वेळ ही नेहमी अशी असावी ज्यावेळी तुम्हाला नको ती कामे किंवा नको त्या मनोरंजना च्या गोष्टी आठवणार नाहीत. म्हणजे बघा ना एकतर तुम्ही पहाटे अभ्यास केलात तरी तुम्हाला काही कामे आठवत नाहीत आणि जर तुम्ही रात्रीचे जागून अभ्यास केलात तरी तुम्ही काही कारचे म्हंटले तरी करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे अशा वेळी घरात व सर्वत्र शांतता असते ज्यामुळे अभ्यासात व्यत्यय येत नाहीत.


अभ्यास किती वेळ करावा


अभ्यास किती वेळ करावा असे काही ठरवून करू नका, जो पर्यन्त तुमचा मेंदू पुर्ण पणे त्या वाचना तील किंवा लिखाणा तील गोष्टीं मध्ये रमतो आहे तो पर्यन्त अभ्यास करावा. जसे बराच वेळ काम केल्यावर किंवा व्यायाम केल्या वर तुमचे शरीर दमते आणि त्याला आरामाची गरज असते. अगदी तसेच तुमच्या मेंदूला देखील ठराविक कालावधी नंतर थोड्या विश्रांती ची गरज असते.
तुम्ही अभ्यास करताना असे जरूर ठरवा की आज मी हा अमुक अमुक धडा किंवा टॉपिक पूर्ण संपवेन, आणि मग बघा तुमचे शरीर आणि मेंदू एकत्रित पणे ते काम पूर्ण करण्यासाठी काम करतील. परंतु तुम्ही जर इतके तास अभ्यास करायचेच असे जर ठरवले तर त्या मध्ये तुमचा म्हणावं तेवढा अभ्यास होणार नाही. त्यामुळेच तुम्ही अभ्यास किती वेळ करता याला महत्व नाही तर तो कसा करता ते महत्वाचे आहे.



अभ्यासाचे नियोजन कसे करावे
कोणत्या ही गोष्टीचे व्यवस्थित नियोजन केल्यास ती चांगली होतेच. जसे की आपण एखाद्या ठिकाणी फिरायला / ट्रीपला जाताना ज्या प्रमाणे सर्व काही आधीच ठरवतो आणि मग त्या नुसार जायच्या दिवशी ठरलेल्या वेळेला निघतो, विविध स्पॉट बघतो आणि रिटर्न च्या दिवशी परत माघारी आपल्या घरी येतो. अगदी तसेच तुम्हाला अभ्यासाचे नियोजन हे करावेच लागेल.
नियोजन बद्ध केलेला अभ्यास हा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. जर तुमची परीक्षा ही ३० दिवसां नंतर असेल तर त्यानुसार विषयांचे वेळापत्रक बनवा. अगदी प्रत्येक विषयातील प्रत्येक धडा कधी आणि कोणत्या तारखेला करायचा आहे ते संपूर्ण आधीच ठरवा. असे केल्याने तुम्हाला परीक्षा २ – ४ दिवसांवर आल्यावर ताण पडणार नाही. आणि सर्व विषयांना तुम्ही समान वेळ देखील देऊ शकता.

अभ्यास कसा करावा 

अभ्यास केल्याने काय साध्य होणार आहे हे जो पर्यन्त तुम्ही स्वतःच्या मेंदूला आणि मनाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यासात गती घेणार नाही. लहान लहान ध्येय ठेवून ती पूर्ण करा असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. जो पर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला पूर्ण करण्याचे मनाशी ठरवत नाही तो पर्यंत ती पूर्ण होणार नाही आणि ज्या वेळी तुम्ही त्या गोष्टीशी निगडीत एखादे ध्येय ठेवता तेंव्हा तुमचे शरीर,मन आणि मेंदू ते ध्येय गाठण्या साठी एकत्रित पणे काम करतात, आणि ते ध्येय तुम्ही सहजतेने मिळवू शकता.




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

How to earn money on Sharechat app in 5 easy ways! in English language

भारत में Instagram ॲप से पैसे कमाने के 9 तरीके. 9 Ways to Make Money from Instagram in India.

आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi